Watch Live

‘पूर्वा केमटेक प्रा. लि.’ नाशिक तर्फे आयोजित प्रदर्शनात ‘मिलांज द्राक्ष महाराजा’ या नांवाने स्पर्धा भरविण्यात येत आहे. याठिकाणी उत्कृष्ठ द्राक्षांचे नमुने आकर्षकरित्या मांडण्यात येतील व त्यांच्यात स्पर्धा ठेवण्यात येईल.

नियम व अटी:
 • 1) स्पर्धा फक्त द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांंसाठी आहे. व्यापाऱ्यांसाठी नाही.
 • 2) प्रत्येक शेतातील एका जातीचा फक्त एकच नमुना असावा. एका बागेतील दोन किंवा जास्त नमुने आढळल्यास सर्वच नमुने बाद ठरवण्यात येतील.
 • 3) नमुना घेतलेल्या शेताचा सर्वेनंबर नमुन्याबरोबर देणे आवश्‍यक आहे.
 • 4) स्पर्धेसाठी एका नमुन्याचे तीन घड आणावेत. त्यातील दोन प्रदर्शनात ठेवण्यासाठी आणि एक परिक्षकांच्या तपासणीसाठी असेल.
 • 5) घडाच्या बाह्यस्वरूपासोबत त्यांच्या रसाचासुध्दा विचार करण्यात येईल. (ब्रीक्स / टी.एस.एस./ गोडी/ चव/ स्वाद इ.)
 • 6) घड काडीसह असावा. देठाच्या दोन्हीही बाजूंना काडीची लांबी अंदाजे 3-4 सें.मी. (दीड इंच ) असावी.
 • 7) नमुन्यासोबत पुढील माहिती असावी. शेतकऱ्यांचे पूर्ण नांव, पूर्ण पत्ता,फोन नंबर/मोबाईल नंबर,द्राक्षाची जात, त्या जातीखालील अंदाजे क्षेत्र
 • 8) नमुने दि. 11/03/2021 रोजी सकाळी 1100ः वा. पर्यंत प्रदर्शनस्थळी स्वीकारले जातील.
 • 9) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

क्षेत्राच्या व उत्पादनाच्या दृष्टीने आंब्याच्या खालोखाल केळीचा क्रमांक लागतो. केळीच्या उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो. केळी उत्पादन करणाऱ्या प्रांतात क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्राचा जरी तिसरा क्रमांक लागत असला तरी व्यापारी दृष्टीने किंवा परप्रातांत विक्रीच्या दृष्टीने होणाऱ्या उत्पादनात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक लागतो. सुमारे 50 % उत्पादन महाराष्ट्रात होते. केळी हे एक परिपूर्ण व पौष्टिक अन्न मानले जाते. असे जरी असले तरी केळी पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्‍यक आहे. या दृष्टीने पूर्वा परिवाराने आयोजित केलेल्या कोण होणार ’मिलांज बनाना किंग’ या स्पर्धा व फळप्रदर्शनाद्वारे केळीचे ब्रॅण्डींग होऊन याचे महत्व जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे. तसेच व्यापारी, निर्यातदार व फळउत्पादक यांचीही एकमेकांशी ओळख/माहिती होऊन शेतकऱ्यांना बाजारपेठ व व्यापाऱ्यांना तयार माल उपलब्ध होण्यास मदत होते. प्रोत्साहनपर मिळणाऱ्या बक्षिसामुळेही शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वास द्विगुणीत होतो व परिसरातील शेतकऱ्यांसाठी ते मार्गदर्शकही ठरतात. चला तर... या स्पर्धेच्या तयारीला लागुयात!

नियम व अटी:
 • 1) स्पर्धा फक्त उत्पादक शेतकऱ्यांंसाठी आहे. व्यापाऱ्यांसाठी नाही.
 • 2) प्रत्येक शेतातील एका जातीचा फक्त एकच नमुना असावा. एका बागेतील दोन किंवा जास्त नमुने आढळल्यास सर्वच नमुने बाद ठरवण्यात येतील.
 • 3) नमुना घेतलेल्या शेताचा सर्वेनंबर नमुन्याबरोबर देणे आवश्‍यक आहे.
 • 4) स्पर्धेसाठी 1 घड आणावा.
 • 5) नमुन्यासोबत पुढील माहिती असावी. शेतकऱ्यांचे पूर्ण नांव, पूर्ण पत्ता,फोन नंबर/मोबाईल नंबर, फळाची जात, त्या जातीखालील अंदाजे क्षेत्र.
 • 6) नमुने दि. 11/03/2021 रोजी सकाळी 1100ः वा. पर्यंत प्रदर्शनस्थळी स्वीकारले जातील.
 • 7) परिक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

सुचना : सर्व शासकिय नियमांचे पालन करुन प्रवेश फक्त स्पर्धक शेतकऱ्यांना व परिक्षकांनाच असेल.

शासकिय अनुमती मिळाल्यास प्रेक्षकांना प्रवेश दिला जाईल.

Gallery